France, फेब्रुवारी 12 -- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांनीफान्सचेअध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी आजअनेकद्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान, मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याचे आवाहनही दोन्ही नेत्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फ्रान्स दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी विमानातही चर्चा झाली. भारत-फ्रान्स संबंध नव्या उंचीवर पोहोचल्याची पुष्टी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली आहे. मोदी आणि मॅक्रॉन यांनी द्विपक्षीय सामरिक भागीदारी, जागतिक मुद्दे, दहशतवाद, युरोप, मध्य पूर्व आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भूराजकीय घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केल...