Sambhaji nagar, फेब्रुवारी 5 -- Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी घटना घडली आहे. येथील एका मोठ्या व प्रतिष्ठित बिल्डरच्या मुलाचे रात्री खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. संबंधित बिल्डर हा रात्री जेवण झाल्यावर मुलासह फिरत होता. त्याचा मुलगा का सायकलवर मागून येत असतांना एका काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या आरोपींनी त्याला उचलून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. ही घटना ९ च्या सुमारास सिडको एन-४ मार्गावर घडली.

चैतन्य सुनील तुपे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. सुनील तुपे हे औरंगाबाद येथील मोठे बिल्डर आहेत. ते मंगळवारी रात्री चैतन्य सोबत फिरत होते. यावेळी, त्यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या सेंट्रल मॉल येथून त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. पोल...