Beed, फेब्रुवारी 6 -- Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात बीड जिल्हा चर्चिला जात आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या बातम्या का पाहतो असे म्हणत, या खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या काही मित्रांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देखील आरोपींनी दिली आहे. हा घटनेत युवक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अशोक शंकर मोहिते असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. तर वैजनाथ बांगर, अभिषेक सानप असे तरुणाला मारहाण करणाऱ्...