Satna, मार्च 23 -- मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलगवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास कुटुंबीयांना मुलगी रडताना दिसली. मुलगा बाहेर खेळत होता. मुलीने सांगितले की, शेजारच्या एका व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली.

यामुळे मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाला. आरोपीला बीएनएसच्या कलम ६५ (२) (मुलावर बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.

या घटनेवरून राज्याचे राजकारण तापले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्य...