Mumbai, जानेवारी 31 -- Soybean Purchase Deadline Extended : सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा देत सोयाबीन खेरदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज (३१ जानेवारी) संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी एकच गर्दी उसळली होती व केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे.

राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला ६फेब्रुवारीपर्यंत मुदत व...