भारत, मार्च 15 -- महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट करण्यासाठी येत्या १९ मार्च रोजी 'किसानपुत्र आंदोलनाने' राज्यातील जनतेला एका दिवसासाठी अन्नत्याग करण्याची हाक दिली आहे. संघटनेतर्फे राज्यात ठिकठिकाणी सामूहिक उपोषणाचे कार्यक्रम व सहवेदना सभा होणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे या शेतकरी कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला येत्या १९ मार्च रोजी ३९ वर्षे होत आहेत. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु लोकसभा व विधानसभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा साधा ठराव देखील करण्यात आला नाही. राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनाशून्य झाले ...