Mumbai, फेब्रुवारी 10 -- सध्या गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) करणं टाळावं, असा सल्ला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी शंकरन नरेन यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं गुंतवणूक विश्वात खळबळ उडाली आहे.

सध्या स्मॉल आणि मिड कॅप फंडांचं मूल्यांकन जास्त असल्यानं अशा फंडांमधील गुंतवणूक काढण्याचा विचार केला पाहिजे. गुंतवणूकदारांनी महागड्या फंडांमध्ये एसआयपी केल्यास ही रणनीती त्यांच्यासाठी घातक ठरू शकते, विशेषत: जर गुंतवणूक दीर्घकाळ केली गेली नाही तर बहुतेक गुंतवणूकदारांना पुढचा काळ कठीण जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शंकरन यांचं हे भाषण नंतर मागे विविध प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्यात आलं. मात्र, ते नेमकं काय आणि का म्हणाले? जाणून घेऊया सविस...