भारत, फेब्रुवारी 3 -- राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री जनतेच्या भेटीला येणार आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये मंत्री भेटीसाठी उपलब्ध असतील. या भेटीसाठी नागरिकांना अर्ज करावा लागणार असून बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत. तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. त्यानुसार मंत्र्यांच्या भेटीची वेळ दिली जाईल, असे शिवसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे.

दर सोमवारी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनमध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय साम...