Shirdi, फेब्रुवारी 3 -- Shirdi Murder: दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष साहेबराव घोडे (साई संस्थान कर्मचारी, घटना घडली कर्डोबा नगर चौक), नितीन कुष्णा शेजुळ (साई संस्थान कर्मचारी, घटना घडली साकुरी शिव) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर (रा. श्रीकृष्णानगर) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

शिर्डीमध्ये आज सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला करण्यात आला. यात शिर्डी देवस्थानच्या दोघांचा समावेश आहे. दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले....