भारत, जानेवारी 27 -- कर्नाटकातील हुबळी येथे अतुल सुभाष आत्महत्येसारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून चामुंडेश्वरी नगरमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यावर लिहिले आहे, 'बाबा, मला माफ करा, तिला (पत्नीला) माझा मृत्यू हवा आहे.' कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करत शवपेटीवर त्याच्या आत्महत्येचे कारणही लिहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीटर सॅम्युअल (वय ४०) हा हुबळीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. त्यावर लिहिलं होतं, "मला माफ करा बाबा. पिंकी मला मारत आहे. तिला माझा मृत्यू हवा आहे. यानंतर त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

दोन बायका अन् फजिती ऐका..! डॉक्टर नवऱ...