भारत, मार्च 12 -- 'शिक्षक महासंघा'चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री, आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भोयर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भोयर यांनी २०२० साली अमरावती विभाग शिक्षक मतदार संघची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ८ हजार मते मिळाली होती. भोयर यांनी शिक्षण क्षेत्र तसेच शिक्षकांसाठी भरपूर काम केले असून त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पक्षाचे संघटन वाढणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांच्या निगडित समस्यांची उत्तम जाण असलेल्या चंद्रशेखर भोयर यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 'शिक्षक महासंघा'ची स्थापना केली होती. शिक्षकांची मोट बांधून त्यांनी शिक्षकांच...