Palghar, फेब्रुवारी 6 -- Palghar News : पालघर येथील बोरशेट्टी गावाजवळील जंगलातून आठवडाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पालघर पोलिसांना सापडला आहे. २८ जानेवारी रोजी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या १२ जणांच्या हौशी शिकारी गटाचा मृत व्यक्ती सदस्य होता. तसेच शिकार करत असतांना घातलावून बसलेल्या आपल्याच सहकाऱ्याला शिकार समजून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याला मदत न करता त्याचे इतर सदस्य हे फरार झाले होते.

दरम्यान, शिकऱ्यांच्या या गटातील आणखी एका सदस्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू हा गोळी लागण्याने झाल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी या घटनेटचा तपास सुरू केला. यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यूची घटना उघडकीस आली. दरम्यान, अफवा पसरलेल्या व्यक्तीचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याच्या वृत्त पोलिसांनी ...