भारत, जानेवारी 27 -- बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली. आयफा २०२५ च्या प्री-इव्हेंटमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याचं मनमोहक व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, शाहरूखच्या हातातील घड्याळज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानने ऑडेमार पिगुएचे लिमिटेड एडिशन घड्याळ परिधान केले होते. हे घड्याळ १८ कॅरेट वाळूच्या सोन्यापासून बनवलेले आहे. हे खास घड्याळ अतिशय काटेकोरपणे डिझाइन करण्यात आले असून जगभरात अशी केवळ २५० घड्याळे उपलब्ध आहेत.

शाहरुख खानने हातात घातलेल्या ऑडेमार पिगुए यांच्या या घड्याळाची किंमत सुमारे ७६ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शाहरुखच्या स्टाईल स्टेटमेंटमधून पुन्हा एकदा त्याच्या छंदाची आणि क्लासची झलक पाहायला मिळते. शाहरुखला अशा ख...