New delhi, फेब्रुवारी 4 -- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत उत्तर दिले. "हे माझे १४ वे संबोधन आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देण्याची संधी देशातील जनतेने मला चौदाव्यांदा दिली हे माझे भाग्य आहे. त्यामुळे मी जनतेचे आदरपूर्वक आभार मानतो. काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही खोट्या घोषणा दिल्या नाहीत, आम्ही खरा विकास दिला, त्यामुळेच २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. एका पुस्तकाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोकांना परराष्ट्र धोरणावर बोलणे आवडते. पंतप्रधानांनी JFK's Forgotten Crisis हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीए सरकारचा भर 'जकुझी'वर नसून...