Mumbai, जानेवारी 30 -- Maha Kumbh 2025: प्रयागराजच्या आगमनाने महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसाचे नशीब उजळले आहे. आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा आता बॉलिवूडच्या चित्रपटात झळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटात दोन अभिनेत्रींसोबत मोनालिसादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मोनालिसा कुटुंबासह महाकुंभात माळा विकण्यासाठी आली होती. यावेळी काही युट्यूबर्सनी तिचा व्हिडिओ बनवला आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की, तिला स्वत:ला लपवण्याची वेळ आली. अखेर तिला इंदूरमधील आपल्या घरी परतावे लागले.

'द डायरी ऑफ मणिपूर' या आगामी चित्रपटासाठी मोनालिसाची निवड केल्याची माहिती दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी दिली. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असून ...