New delhi, एप्रिल 20 -- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२५ च्या ३७ व्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध आणखी एक अर्धशतक झळकावत इतिहास रचला आहे. किंग कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला आहे. कोहलीच्या बॅटमधील हे शानदार अर्धशतक एका निर्णायक वळणावर आले. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला १५८ धावांचे लक्ष्य दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिल सॉल्ट पहिल्या ओव्हरमध्येच आऊट झाला होता, त्यानंतर सर्व दबाव विराट कोहलीवर आला. कोहलीने पडिक्कलसोबत शतकी भागीदारी करत संघाला विजयाचा मार्ग दाखवला.

विराट कोहलीची ही आयपीएलमधील ६७वी ५०+ धावसंख्या आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने ६६ वेळा ही कामगिरी केली होती. आता कोहली आयपीएलच्य...