Mumbai, मार्च 29 -- 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधून सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा बऱ्याच दिवसांनी एकत्र पुनरागमन करणार आहेत. या शोचा प्रोमोही रिलीज झाला आहे. अनेक वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या निमित्ताने सुनील ग्रोव्हरने ७ वर्षांनंतर कपिलसोबतच्या भांडणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतचं भांडण आठवून त्याची खिल्ली उडवली आहे. यावर बोलताना सुनील ग्रोव्हर म्हटले की, हे त्यांचे इतक्या वर्षांचे प्लानिंग होते.

या भांडणाबद्दल बोलताना सुनील ग्रोव्हर म्हणाला की, 'आम्ही फ्लाइटमध्ये बसलो होतो आणि आम्हाला कळले की, नेटफ्लिक्स आता भारतात मोठा बिझनेस घेऊन येत आहे. त्यामुळे आता एखादा चांगला पब्लिसिटी स्टंट करावा लागेल, असं आम्हाला वाटलं. यानंतर आम्हा दोघांच्याही मनात हा भांडणाचा विचार आला. ...