Nagar, मार्च 12 -- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र,विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणानंतर थोरात यांना यंदाची कारखान्याची निवडणूक जड जडाण्याचे संकेत दिसत आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचीत आमदार अमोल खताळ यांना विखे गटाची साथ मिळत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात'रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स' या संस्थेने सह्याद्री कारखाना क्षेत्रात ग्राउंडवर जाऊन आढावा घेतला आहे.

महाराष्ट्रातील विविध सहकारी साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची देखील लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. साधारणत:एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक संपन्न होईल,असा अंदाज व्यक्त के...