भारत, फेब्रुवारी 11 -- विदर्भातील धापेवाडा गावातील सिंगल-कॉटन पट्टी किनार साड्यांचा समृद्ध असा पारंपरिक हस्तकला वारसा जतन करण्यासाठी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT- National Institute of Fashion Technology) या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. सध्य यंत्र आधारित वस्त्रनिर्मितीच्या रेट्यामुळे साधे पण उठावदार, नजाकतदार असे हे हातमाग वस्त्रनिर्मितीची परंपरा लयास जाते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे भारताच्या पारंपारिक हस्तकलेचे जतन करणे आणि हे कलाशास्त्र समजून घेण्यासाठी हस्तकला संशोधन दस्तऐवजीकरण केले जाते. निफ्टचे प्राध्यापक संदीप किडीले यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे विद्यार्थी विदर्भातील पट्टी किनार साड्यांच्या विणकाम परंपरेचा मागोवा घेत असून ...