Mumbai, फेब्रुवारी 27 -- बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन करत आहे. विकी कौशलला या चित्रपटासाठी खूप प्रेम मिळत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विकी कौशलच्या छावा या चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर या चित्रपटाने भारतात 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जाणून घेऊया विकी कौशलच्या चित्रपटाच्या कमाईचे आकडे.

विकी कौशलच्या 'छावा'ने 13 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतात 21.75 कोटींची कमाई केली आहे. सनिल्कच्या म्हणण्यानुसार, विकी कौशलच्या या चित्रपटाने यासह भारतात 385 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 219.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्याने 25 कोटी कम...