Mumbai, फेब्रुवारी 3 -- Mumbai City Book Festival : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सवबुधवार ५ फेब्रुवारी आणि गुरुवारी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,दादर (पू.) येथे पार पडणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर "लेखक तुमच्या भेटीला" आणि "एका संगीतकाराची मुशाफिरी" या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन,व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच "शब्दव्रती" या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जात...