Mumbai, एप्रिल 28 -- बेलारूसच्या वस्त्रोद्योग मंत्री तात्सियाना लुहिना यांनी नुकतीच तीन दिवसाची भारताला धावती भेट दिली. आपल्या या भारत भेटीत त्यांनी जवळपास तीन वस्त्रोद्योग कंपन्यांना आणि फॅशन डिझाईन करणाऱ्या संस्थांना मुंबई आणि कोईमतूर येथे भेटी दिल्या. कोईमतूर येथे ज्या टेक्स्टाईल मिल्स आहेत आणि फॅशन डिझायनिंग शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या संस्था आहेत त्यांनाही भेटी दिल्या. आपल्या या भेटीसाठी आपण अतिशय उत्सुक होतो असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की भारत आणि बेलारूस यांच्यात या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहकार्य झाले पाहिजे आणि तसे करण्याचा आमचा विचार आहे.

सध्या बेलारूस भारतामध्ये वार्षिक दहा लाख दशलक्ष डॉलर्सचे टेक्स्टाईल निर्यात करते दोन्ही देशातील व्यापार या त्या त्या देशांच्या राष्ट्रीय चलनामध्ये आता होत आहे ...