Mumbai, फेब्रुवारी 4 -- Devendra Fadanvis On Varsha Bunglow residence : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत, मात्र अद्याप ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) रहायला गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य अजूनही सागर बंगल्यावरच असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी केलेल्या आरोपांमुळेही 'वर्षा' बंगला पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा'वर कधी रहायला जाणार याची माहिती दिली.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर महत्त्वाचे निर्णय

एका वृत्तपत्राच्या विशेष ...