MP, फेब्रुवारी 2 -- मध्य प्रदेशात वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुलांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही मुलांना वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते. दोघांचेही आपापले दावे होते. दरम्यान, वडिलांचा मृतदेह तसाच पडून राहिला. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र चितेला अग्नी कोणी द्यायचा यावरून वाद निर्माण झाला व ग्रामस्थ व नातेवाईक ताटकळत उभे राहिले.

मध्य प्रदेशातील टीकमगडमध्ये हा अनोखा प्रकार समोर आला आहे. वडिलांवर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून दोन्ही मुलांमध्ये भांडण झाले. धाकट्या मुलाने वडिलांची सेवा केल्यामुळे त्याला वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते, तर मोठ्या मुलाचा स्वत:चा दावा होता. गावकऱ्यांना ही बाब कळताच ते स्तब्ध झाले.

घोर कलियुग..! नवऱ्याला १० लाखात किडनी विकायला लावली अन् बायको पैसे घेऊन प्रियकरासोबत...