Delhi, फेब्रुवारी 13 -- JPC Report on Waqf Bill : वक्फच्या सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत गुरुवारी विरोधी पक्षांनी तुफान राडा केला. लोकसभेत झालेल्या गदरोळामुळे कामकाज ठप्प झालं होतं. लोकसभेच कामकाज हे सुरुवातीला १५ मिनिटांसाठी व त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल सादर करण्यात आला तेव्हा विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ घातला.

वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आला. हे विधेयक मांडताच सभागृहात जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत सरकार वक्फ बोर्डांना कमकुवत करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यापूर्वी ३१ ...