Delhi, फेब्रुवारी 11 -- Criminal cases on MP : लोकसभेच्या खासदारांवर किती गुन्हे आहेत याची आकडेवारी सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली आहेत. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकसभेतील ५४३ खासदारांपैकी तब्बल २५१ खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभेतील खासदार यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. यची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. यावरून लोकसभेच्या ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर फौजदारी खटले प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात १७० खासदारांना पाच किंवा त्याहून जास्त वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ज्येष्ठ वकील विजय हंसारिया यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ८३ पानांचा अहवाल सादर केला. हा अहवाल विविध उच्च न्यायालयांची माहिती घेऊन तयार करण्या...