भारत, फेब्रुवारी 9 -- अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स, पुणे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना त्यात कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केल्या. कृषी क्षेत्र हे 'विकासाचे पहिले इंजिन आहे', असं सीतारामन म्हणाल्या. इकडे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दुष्काळ संपवणार असं म्हटलं आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करा, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी ड्रोनचा वापर करावा असा सल्ला कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. या पार्श्वभूमिवर पुणे स्थित 'फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्स' संस्थेचे अध्यक्ष आणि शेती विषयाचे जाणकार सतीश देशमुख यांनी या लेखाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारपुढे काही महत्वाचे प...