Mumbai, फेब्रुवारी 3 -- महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना (२ फेब्रुवारी) अहिल्यानंतर येथे पार पडला. या सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. पृथ्वीराज मोहोळ हा ६७वा महाराष्ट्र केसरी ठरला.

पण या सामन्यापूर्वी चांगलाच राडा झाला. सेमी फायनल सामन्यात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली. वास्तिवक, सेमी फायनलचा सामना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. यात मोहोळने बाजी मारली. पण या सामन्यात पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचे शिवराज राक्षे याचे म्हणणे होते. यावरून हा राडा झाला. यावेळी शिवराजने पंचांची कॉलर ओढली आणि त्यांना लाथही मारली.

आता या वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिल...