भारत, नोव्हेंबर 24 -- लातुरमध्ये उसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर आग भडकली आणि यामध्ये सात वाहने जळून खाक झाली आहेत. अपघतात कोणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडले याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. या घटनेनंतर लातुर-उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे उसाच्या ट्रॅक्टरने डिझेलने भरलेल्या टँकरला धडक दिली. यानंतर डिझेल टँकरला आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केलं. यामध्ये सात वाहने जळून खाक झाली आहेत. या अपघातानंतर पाच पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली.

रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने वळण रस्त्यावरून वाहतूक वळवली आहे. तिथेच हा अपघात झाला आहे. अरुंद रस्ता असल्याने एकापाठ...