भारत, मार्च 2 -- 'बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर' या संस्थेतर्फे चेंबूर येथे यशस्वी उद्योजकांना गौरविण्यात आले. यावेळी डिक्की (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे) संस्थापक अध्यक्ष व उद्योजक मिलिंद कांबळे, बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअरचे प्रमुख अरुण धनेश्वर, चेतना कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मधुमिता पाटील, चेतना आर. के इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या संचालिका डॉ नंदिता मिश्रा, सिने कलाकार साहिला छड्डा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाचे प्रकाशन मिलिंद कांबळे आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच १३ यशस्वी उद्योजकांना पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये तन्वी...