UP, फेब्रुवारी 14 -- यूपीतील सहारनपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पतीने पत्नीला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले. यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाणे गाठून पती, दीर, सासू व ननंद विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण सहारनपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. चमनपुरा येथील रहिवासी सुशील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी सोनल हिचा विवाह १५ फेब्रुवारी २०२३ रोजी हरिद्वार जिल्ह्यातील पिरंकालियार पोलिस ठाणे क्षेत्रातील जसवाला गावातील रहिवासी अभिषेक उर्फ सचिन याच्याशी झाला होता. लग्नात वधू पक्षाने हुंड्याच्या रुपात कार व दागिन...