Mumbai, मार्च 3 -- Marathi Song : मराठी रोमँटिक गाण्यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. प्रेक्षकांच्या मनावर ही रोमँटिक गाणी भुरळ घालत असून त्यांच्या दिलाचा ठेकाही चुकवायला भाग पाडत आहेत. आजवर सिनेविश्वातील अनेक रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले आणि अशातच भर घालत आणखी एक रोमँटिक गाणं 'काही कळेना मला' प्रेक्षकांना आणि प्रेमीयुगुलांना मंत्रमुग्ध करून सोडायला आल आहे. या गाण्याची खासियत म्हणजेच हे गाणं इतर कुठे नव्हे तर परदेशात चित्रित झालं असल्याचं दिसत आहे. लंडन येथे चित्रित झालेल्या या रोमँटिक गाण्याची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळेल. 'काही कळेना मला' हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आल आहे.

लंडनमध्ये शूट झालेल्या या अनोख्या प्रेमगीतातून समोर आलेली कथा प्रेक्षकांना भावतेय. हरिश वांगीकर...