Canada, फेब्रुवारी 18 -- Plane Crash on Toronto : कॅनडातील टोरंटो विमानतळावर मोठा विमान अपघात झाला आहे. क्रॅश लँडिंगदरम्यान एक विमान पूर्णपणे उलटे झाले. सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही. डेल्टा एअरचे विमान ४८१९ सोमवारी लँडिंगदरम्यान धावपट्टीवर उलटले. विमानातील ७६ प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले आहेत.

सोमवारी अमेरिकेतील मिनेसोटा येथून येणारे विमान टोरंटो विमानतळावर उतरणार होते. मात्र, लँडिंग दरम्यान, असं काही घडलं की विमान उलटं झालं. काही व्हिडिओंमध्ये लोक विमानातून गुडघ्यावर रांगत बाहेर येतांना दिसत आहेत. यावेळी विमानतळावर बर्फवृष्टी होत असून जोरदार वारेही वाहत आहेत. अमेरिका आणि कॅनडामध्ये सध्या चक्रीवादळाचा कहर सुरू आहे. क्रॅश लँडिंगनंतर विमानाला आग लागली. त्यावेळी विमानात अनेक प्रवासी होते. अग्निशमन दलाच्या अनेक पथकांनी तातडीने येऊन...