Delhi, फेब्रुवारी 2 -- Vegetarian Food in Vande Bharat Express : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला आता या रेल्वेने प्रवास करतांना तुम्हाला जेवणाची चिंता करावी लागणार नाही. नवी दिल्लीहून कटरा येथील श्री माता वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ तयार करण्यात येत होती. त्यामुळे अनेकांनी जेवणाच्या दर्जावर शंका उपस्थित केली होती. पण आता काळजी करण्याची गरज नाही. नवी दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता १०० टक्के शाकाहारी जेवण मिळणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यातील श्री माता वैष्णोदेवी चे तीर्थक्षेत्र हे पवित्र स्थळ मानले जाते. त्यामुळे नवी दिल्ली ते...