Delhi, फेब्रुवारी 16 -- New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभात जाण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे दिल्ली स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक जखमी झाले. यात अनेक मुलांचा देखील सहभाग आहे. रेल्वे बोर्डाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दिल्लीतील मुख्य रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभात जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक विनातिकीट प्लॅटफॉर्मवर पोहोचले होते. त्यांना थांबवले देखील जात नव्हते. तेवढ्यात रोखलेही जात नव्हते. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एक...