भारत, फेब्रुवारी 4 -- sikh footballer patka controversy football match : स्पेनमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान एक विचित्र वाद समोर आला आहे. यामुळे क्रीडा विश्वात मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे. सामन्यात एका १५ वर्षीय शीख खेळाडूला त्याचा पटका काढण्यास सांगण्यात आले. यानंतर सहकारी खेळाडू आणि स्टाफने आपल्या शीख खेळाडूला पाठिंबा देत सामना खेळण्यास नकार दिला.

वास्तविक, स्पेनच्या देशांतर्गत स्पर्धेत अराटिया सी (Arratia C) आणि पडुरा डी अरिगोरियागा (Padura de Arrigorriaga) संघ यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अरातिया सी संघाचा १५ वर्षीय शीख खेळाडू गुरप्रीत सिंगही खेळत होता. पण सामन्यात रेफ्रींनी गुरप्रीत सिंगला नियमांचा हवाला देत पटका काढण्यास सांगितले. पण गुरप्रीतने तसे करण्यास नकार दिला. पण रेफ्री त्याच्या म्हणण्यावर ठाम राहिले. दरम्यान...