भारत, एप्रिल 26 -- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याबरोबरच अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उदाहरणार्थ, कंपनीने लाभांश जाहीर केला आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रिलायन्सने ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी एका कंपनीचे अधिगृहन केले आहे.

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एचआर, नॉमिनेशन अँड रेमोनेरेशन कमिटीच्या शिफारशीनुसार बोर्डाने १ मे २०२५पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. शेअरहोल्डर्सच्या मान्यतेने अनंत अंबानी रिलायन्समध्ये पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय भूमिकेत दिसणार आहेत.

अनंत अंबानी हे रिलायन्स समूह...