Mumbai, फेब्रुवारी 13 -- Realme GT 7 Pro Racing Edition Launched: चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने आपल्या मायदेशात जीटी-सीरिजचा नवीन स्पेशल एडिशन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने रियलमी जीटी ७ प्रोचे परफॉर्मन्स फोकस्ड व्हर्जन म्हणून रियलमी जीटी ७ प्रो रेसिंग एडिशन लॉन्च केले आहे. या फोनचे उर्वरित हार्डवेअर अर्थातच स्टँडर्ड व्हर्जनसारखे असले तरी यात चांगला कॅमेरा आणि गेमिंग परफॉर्मन्स मिळेल, असा दावा केला जात आहे.

रियलमी जीटी ७ प्रो रेसिंग एडिशनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात मायक्रो-क्वाड कर्व्ड डिझाइनव्यतिरिक्त ६.७८ इंचाचा बीओई एस २ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६००० नाइट्सची पीक ब्राइटनेस देतो. हे एचडीआर १०+ आणि डॉल्बी व्हिजनला देखील सपोर्ट करते. फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन ८ ए...