Satara, एप्रिल 25 -- रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीमच्या एका सदस्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. सौरभ शर्मा असं या २६ वर्षीय डान्सरचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गाण्याच्या चित्रीकरणानंतर लगेचच कोरिओग्राफरचा बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीजवळ शुटिगर सुरू होते. एका गाण्याचं शूट झालं होतं ज्यात रंग उडवले गेले होते. शूटिंग संपल्यानंतर सौरभ कृष्णा नदीत हात धुण्यासाठी उतरला होता. हात धुऊन तो नदीच्या खोल पात्रात पोहायला उतरला आणि जोरदार प्रवाहात वाहून गेला.

शोधमोहिमेत डान्सर न सापडल्य...