Mumbai, फेब्रुवारी 10 -- Ranveer Allahbadia apology News : समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये आई-वडील व मुलांच्या नात्यावर अत्यंत घाणेरडा आणि अश्लील जोक्स केल्यामुळं अडचणीत आलेला युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया ताळ्यावर आला आहे. त्यानं आपल्या अभद्र टिप्पणीबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

अलाहबदियानं शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाला भयंकर प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकून प्रेक्षकांना धक्का बसला. मात्र शो होस्ट करणारा समय रैना आणि त्याच्या सोबतचे लोक फिदीफिदी हसत होते. मुंबईतील दोन वकिलांनी अलाहबादिया याच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घडामोडीनंतर अलाहबादिया यानं 'एक्स'वर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.

'त्या शोमध्ये मी जे काही ...