Palghar, फेब्रुवारी 7 -- Palghar Teacher Death : पालघर येथील मनोर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप देण्यात येत होता. यावेळी व्यासपीठावर असतांना राष्ट्रगीत म्हणत असतांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
संजय लोहार असे या शिक्षकाचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटका आल्याने ते व्यासपीठावर कोसळले. विद्यार्थ्यांनी व शाळेतील इतर शिक्षकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यातील मनोर येथे ४ फेब्रुवारी रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन केले हो...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.