Delhi, फेब्रुवारी 2 -- Ramdev Baba News : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. केरळमधील न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. रामदेव बाबा यांच्यासह पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे. एका खटल्या प्रकरणी हे दोघे अनुपस्थिती राहिल्यामुळे पलक्कड जिल्हा न्यायालयाने दोघांविरुद्ध वॉरंट जारी केले. केरळ ड्रग इन्स्पेक्टरने दिव्य फार्मसीविरोधात दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात हे दोघेही गैर हजर होते.

न्यायालयाने या दोघांना १५ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोघेही न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी न्यायालयाने या दोघांविरोधात १ फेब्रुवारी रोजी जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, ...