नई दिल्ली, जुलै 3 -- Patanjali vs Dabur Chyawanprash: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम आदेश देत मोठा धक्का दिला आहे. पतंजलीने डाबर च्यवनप्राशविरोधात कोणतीही दिशाभूल करणारी किंवा नकारात्मक जाहिरात प्रसारित करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. डाबरने पतंजलीवर आपल्या जाहिरातींद्वारे डाबर च्यवनप्राशची चुकीची माहिती दिली आणि ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी पतंजली आयुर्वेदविरोधात सुरू असलेल्या वादात डाबर इंडियाला महत्त्वपूर्ण अंतरिम दिलासा दिला. अंतरिम दिलासा देण्याची डाबर यांची ...