भारत, मार्च 27 -- मुलांचे हक्क आणि कल्याणाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र पोलीस आणि युनिसेफ महाराष्ट्र यांनी विशेष बाल पोलीस विभाग (Special Juvenile Police Units - SJPU) गुरुवारी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथिगृहात झालेल्या एका दिवसीय प्रशिक्षण सत्रात राज्यभरातील १०० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष विभागामधील पोलीस अधिकाऱ्यांची क्षमता वाढवून मुलांसाठी सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्यादृष्टीने संवाद व तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. हा विभाग बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ सारख्या कायद्यांच्या अंमलबजावणीत...