भारत, मार्च 7 -- मुंबईत बेकायदा होर्डिंगचा अपघात झाल्यानंतर महायुती सरकार जागे झाले. मात्र फक्त मुंबईत केवळ होर्डिंग्जचा प्रश्न नसून तर संपूर्ण राज्यात अनधिकृत होर्डिंग्जची संख्या प्रचंड वाढलेली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग असून ते कोसळले तर मोठा अपघात होईल. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील होर्डिंग्जचे ऑडिट होणार का, आणि एखादी घटना घडल्यास त्यासाठी मंत्री जबाबदार असतील का असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. राज्यात एकूण ९०२६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले. १८८ ठिकाणी ऑडिट झाले नाही. राज्य...