Mumbai, जानेवारी 31 -- भारतीय लष्कराच्या सेवेत असलेले साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील वडूज येथील जवान चंद्रकांत महादेव काळे (वय ४०) हे कर्तव्यावर असताना बुधवारी शहीद झाले. शहीद काळे हे राजस्थान येथे कार्यरत होते. येथेच युद्ध अभ्यासाचा सराव घेत असताना त्यांना वीरमरण आले.

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर ! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम

शहीद जवान चंद्रकांत महादेव काळे हे भारतीय लष्करात १८ मीडियम रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार पदावर कार्यरत होते. काळे हे १८ मिडियम मराठा तोफखाना रेजिमेंटच्या राजस्थान येथील महाजन फायरींग रेंजमध्ये युध्द अभ्यासाचा सराव घेत होते, त्या वेळी दुर्घटना घडली आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली.

शहीद जवान चंद्रकांत महादेव काळे यांनी १५ वर्षे लष्करा...