New delhi, मार्च 3 -- आई-वडिलांच्या नात्याबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादला आपला कार्यक्रम पुन्हा सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी दिली आहे. याआधी अलाहाबादिया यांनी न्यायालयात धाव घेत हा शो आपल्या उपजीविकेचे एकमेव साधन असून हा कार्यक्रम अपलोड करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला दिलासा दिला, पण त्याच्या कार्यक्रमात शालीनता राखण्याच्या कडक सूचना दिल्या. न्यायालयाने अटींसह 'द रणवीर शो'चे प्रसारण पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

तत्पूर्वी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रणवीर अलाहाबादिया यांच्या याचिकेला विरोध करत 'इंडियाज गॉट अलेटेंट' या चित्रपटातील वक्तव्य अश्लिल आण...