Mumbai, फेब्रुवारी 10 -- India's Got Latent News : समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये आई-वडील व मुलांच्या नात्याबद्दल घाणेरडे व अश्लील वक्तव्य करणारा लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया पुरता गोत्यात आला आहे. त्याच्या वक्तव्यामुळं संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईचे संकेत दिले आहेत. मुंबईतील वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अ‍ॅक्शनमध्ये आले असून चौकशीसाठी ते स्टुडिओमध्ये पोहोचले आहेत.

अलाहबादियानं केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'मी स्वत: त्याचं वक्तव्य पाहिलेलं नाही. मात्र मला जे कळलंय त्यानुसार काहीतरी अभद्र टिप्पणी करण्यात आली आहे. ही गोष्ट निश्चितच चुकीची आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा...