Mumbai, फेब्रुवारी 20 -- सध्या सिनेसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत आहेत. मराठी सिनेसृष्टीत आशयघन विषय असलेल्या चित्रपटांची तर लाट आली आहे. अशातच रोमँटिक आणि आशयघन विषयाची जोड असलेला 'म्हणजे वाघाचे पंजे' हा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. दमदार स्टारकास्ट आणि कथेत ट्विस्ट असणारा हा नवा चित्रपट लवकरच भेटीस येत आहे. चित्रपटातील कलाकार एका वेगळ्याच विषयाला हाताळत कोणता संदेश देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

त्रिशुलीन सिनेव्हिजन प्रस्तुत 'म्हणजे वाघाचे पंजे' या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण अनेकांच्या पसंतीस पडेल यांत शंका नाही. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्...