भारत, ऑगस्ट 4 -- सध्या गुंतवणूकदार कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या आधारे निर्णय घेत आहेत. जून तिमाहीत चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. मजबूत तिमाही निकालानंतर डेल्लीवेरी लिमिटेडच्या (Delhivery ltd) शेअर्समध्ये आज वाढ दिसून आली आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचे शेअर ६ टक्क्यांहून अधिक वधारले. निव्वळ नफ्यात ६८.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

डेल्लीवेरी लिमिटेडने गेल्या आठवड्यात तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत एकूण निव्वळ नफा ९१ कोटी रुपये होता. कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ५.६ टक्क्यांनी वाढून २२९४ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या पार्सल सेगमेंटमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईवर सोमवारी दिल्लीवेरी लिमिटेडचा शेअर...